पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींनी पाहिला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’चा उपक्रम

वाई, १५ एप्रिल (वार्ता.) – येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’च्या वतीने पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखवण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. त्यानुसार ‘शिवसह्याद्री करिअर अकादमी’च्या ५० हून अधिक मुला-मुलींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखवण्यात आला.

स्वा. सावरकर यांच्यातील जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा या मुला-मुलींच्या मनात निर्माण व्हावी, तसेच त्यांनी स्वा. सावरकर यांच्या आदर्श विचारांनुसार वाटचाल करत देशसेवा करावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे, अशी माहिती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात आली. तसेच ‘भविष्यातही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा जागृत करणारे उपक्रम राबवत राहू’, असेही स्पष्ट केले.