मडगाव, १५ एप्रिल (वार्ता.) – समान नागरी कायद्यामुळे गोव्याला शांती लाभली आहे. या कायद्यामुळे लोकांमध्ये समानता आली आहे, असे विधान उद्योजक तथा ‘फोमेंतो’ गटाचे अध्यक्ष अवधूत तिंबलो यांनी केले. उद्योजक अवधूत तिंबलो यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मडगाववासियांनी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी उद्योजक अवधूत तिंबलो बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘नागरिकांनी देशभक्तीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. भारत आता पालटत आहे आणि आता चांगले कायदे कार्यवाहीत आणले जात आहेत.’’ या कार्यक्रमाला मडगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
संपादकीय भूमिकात्यामुळेच हा कायदा देशभर लागू होणे आवश्यक ! |