मुंबईकर याचा गांभीर्याने विचार करतील का ?
मुंबई – मुंबईत गाड्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. या आठवड्यात मुंबईत ४६ लाख एवढी वाहनसंख्या झालेली आहे. प्रतिकिलोमीटर २ सहस्र ३०० गाड्या आहेत. मुंबईत वाहनांच्या संख्येवर वेळीच आळा घातला नाही, तर संपूर्ण शहर बंद पडेल, असे मत वाहतूक तज्ञांनी व्यक्त केले आहे. मागील ५ वर्षांत मुंबईतील वाहनांची संख्या पाच पटींनी वाढली आहे. मुंबईच्या खालोखाल चेन्नई, कोलकाता, बेंगळूरू, देहली येथे गाड्यांची घनता अधिक आहे.