सुट्या पैशांची आवश्यकता नाही
मुंबई – १ एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवरील तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत पालट होणार आहे. तिकीट काढण्यासाठी पूर्वी प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत असे; मात्र केंद्रशासनाने आता रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचे सामान्य तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. १ एप्रिलपासून सामान्य तिकिटांचे पैसे भरण्यासाठी डिजीटल ‘क्यू.आर्. कोड’लाही केंद्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यूपीआयद्वारे हे सामान्य तिकीट काढता येईल. ही सुविधा १ एप्रिलपासून ९६ रेल्वे स्थानकांवर चालू करण्यात येईल. तेथे रेल्वे काऊंटरवर क्यू.आर्. कोडची सुविधा उपलब्ध असेल. क्यू.आर्. कोडमधून गुगल पे, फोन पे यांद्वारे पैसे भरता येतील. या सुविधेमुळे सुट्या पैशांची आवश्यकता भासणार नाही.