नवी मुंबई – अटल सेतू या मार्गाला जगभरातून पसंती मिळत असतांनाच या मार्गावरून जाणार्या एका महिलेने चक्क टॅक्सी थांबवून थेट उडी मारून आत्महत्या केली. दादर येथे कुटुंबियांसमवेत रहाणार्या डॉ. किंजल शाह (वय ४३ वर्षे) यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला ‘छायाचित्र काढायचे आहे’, असे सांगून टॅक्सी थांबवून थेट समुद्रात उडी मारली. ‘आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सीचालकास त्रास देऊ नये’, असे त्यांनी लिहून ठेवले होते.