केदारनाथाची ही महती ठाऊक आहे का ?
केदारनाथ येथील शिवलिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पांडव पापमुक्त झाले. तेथे पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्यशंकराचार्यांनी त्याचा जीर्णाेद्धार केला. येथील शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाहीत. त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे.