शिवपुराण, महाशिवपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये शिवलिंग, शाळिग्राम यांचे उल्लेख आहेत. शिवपुराणात १६४ प्रकारची शिवलिंगे, शाळिग्राम आणि बाण यांचे वर्णन आहे.
शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे. वैज्ञानिक पद्धतीने मंत्र म्हटल्यावर विशिष्ट प्रकारची ऊर्जा, स्पंदने निर्माण होतात, हे सिद्ध झाले आहे आणि त्यातून अपेक्षित परिणाम दिसतात, हे लक्षात आले आहे. असा हा शिवलिंगाचा महिमा आहे.
आजही १४२ ठिकाणी अशी विविधरंगी शिवलिंगे आहेत. कोणार्कला महादेव मंदिरातील शिवलिंग प्रति ३ मासांनी रंग पालटते. काही शिवलिंगे रंग पालटतातच आणि त्यासह दूध, पाणी, मध, सोने, चांदी, पारा हे पदार्थही बाहेर फेकतात.
(साभार : ‘पुरुषार्थ’, फेब्रुवारी २००७)