परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेला श्लोक आणि त्याचा साधकाला झालेला लाभ !

८.३.२०२४ (माघ कृष्ण त्रयोदशी) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या असलेल्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

परात्पर गुरु पांडे महाराज

१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘अन्नातून विषबाधा होऊ नये’, यासाठी अन्न ग्रहण करण्यापूर्वी म्हणायला सांगितलेला श्लोक

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी काही वर्षांपूर्वी महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणायला सांगितला होता.

यदश्नासि यत्पिबसि धान्यं कृष्याः पयः । यदाद्यं यदनाद्यं सर्वं ते अन्नमविषं कृणोमि ।। – अथर्ववेद, काण्ड ८, सूक्त २, खण्ड १९

अर्थ : ऋषी रोग्याला म्हणतात, ‘हे मनुष्या, तू शेतात पिकविलेले जे धान्य खातोस, तसेच तू दूध, पाणी वगैरे जे पितोस, असे खाण्यायोग्य असलेले आणि नसलेले सर्व अन्न मी तुझ्यासाठी निर्विष (अमृत) करत आहे.’

श्री. अभिषेक पै

२. साधकाने श्लोक म्हणून अन्न ग्रहण केल्यावर त्याच्या पचनशक्तीत वाढ होऊन त्याला कसलाही त्रास न होणे

माझी पचनशक्ती न्यून झाल्यामुळे मला वारंवार त्रास होत असे; मात्र मी वरील श्लोक म्हणून अन्न ग्रहण केल्याने (आश्रमाचा महाप्रसाद असो, घरचे जेवण असो किंवा बाहेरचे काही खाल्ल्यावर) मला काहीही त्रास होत नाही. मी बाहेर काही खात असतांना श्लोक म्हणायला विसरलो, तर मला त्रास होतो. आता मी हा श्लोक म्हणूनच अन्न ग्रहण करतो.

अन्न ग्रहण करण्यापूर्वी हा श्लोक म्हटल्यामुळे अन्नातून होणारी विषबाधा टाळली जाऊ शकते. ‘साधकांनी महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी हा श्लोक अवश्य म्हणावा’, असे मला वाटते.’

– श्री. अभिषेक पै, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक