‘या जगामध्ये एकच असा देव आहे की, ज्याने साक्षात् पृथ्वीतलावर आपले वास्तव्य राखले आहे; कारण पृथ्वीतल म्हणजेच माता दुर्गेचे वास्तव्य स्थान ! आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी शिव या पृथ्वीतलावर वास्तव्य करतात. महादेवाची पूजा पृथ्वीतलावर त्याच्या लिंगाच्या रूपात केली जाते; कारण त्यांना तसा शाप दिला होता. शापाचा परिणाम म्हणजे महादेवाचे ‘शिवलिंग’ त्याला ‘पिंडी’ असेही म्हणतात. शिवलिंग हे महादेवाच्या लिंगाचे आणि सृष्टीच्या योनीचे प्रतीक आहे. या शिवलिंगातून सृष्टीची सतत निर्मिती होत रहाते. शिवलिंगाला पूजणे म्हणजे निसर्ग आणि देव यांला पूजणे होय ! यातूनच मनुष्याचे कल्याण साधले जाते.’ (साभार : ‘स्वामी संकेत’)