नाशिक येथील फसवणुकीचे प्रकरण
नाशिक – येथील रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी सूत गिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज मालेगाव अपर सत्र न्यायालयाने ७ मार्च या दिवशी फेटाळला आहे. ६ मार्च या दिवशी दिवसभर हिरे यांच्या जामिनावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत निर्णय राखीव ठेवला होता.
कर्ज घेण्यासाठी बनावट दस्तऐवज सिद्ध करून जिल्हा बँकेकडून ७ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेऊन परतफेड न करता फसवणूक केल्याचा ठपका अद्वय हिरे यांच्यावर आहे.