काठमांडू (नेपाळ) येथील शिवलिंगाला ‘पशुपतिनाथ’ असे म्हटले जाते. पशुपतिनाथाने महिषाचे (म्हशीचे) रूप घेतले होते, अशी कथा आहे. म्हशीचे धड केदारनाथ (हिमालय) आणि पशुपतिनाथ म्हणजे डोके असल्याचे मानले गेले आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. पशुपतिनाथाची पिंड ४ हात उंच आहे. त्यावर चतुर्मुखी शिवलिंग आहे. त्या चारही चेहर्यांवर मुखवटे लावलेले आहेत. ‘मधील मुख हे पाचवे मुख आहे’, असे मानले जाते. (ही पाच मुखे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी संबंधित असल्याचे मानले जाते. – संकलक)
नेपाळच्या राजाचे कुलदैवत असणार्या पशुपतिनाथाची प्रतिदिन तीनदा पूजा होते. अभिषेकानंतर देवतेच्या मस्तकावरील श्रीयंत्राची पूजा होते. प्रती पौर्णिमेला मंदिरात विशेष पूजा केली जाते. श्री गुह्येश्वरीदेवी पशुपतिनाथाची पत्नी आहे. तिचे मंदिर मुख्य मंदिराजवळ आहे. पशुपतिनाथाचे स्थान १२ ज्योर्तिलिंगात नसतांनाही पशुपतिनाथाची यात्रा अतिशय पुण्यदायी मानली जाते.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.