मुंबई – मी आजही आठवड्याला ७० घंटे काम करते. कामाच्या वेळी उत्साह ठेवला, तर सुटीवर असल्याप्रमाणेच वाटते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. काही दिवसांपूर्वी त्यांचे पती आणि इन्फोसिस आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० घंटे काम करण्याविषयी विधान केले होते. त्याचे समर्थन त्यांनी वरील विधानांतून केले.
इन्फोसिसचे संस्थापक श्री. नारायण मूर्ती म्हणाले होते की, आमच्यापैकी ज्यांनी सवलतीत शिक्षण घेतले, त्यांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत. कुणी माझ्यापेक्षा क्षेत्रात चांगला असेल, तर त्याचा मी आदर करतो. देशाची प्रगती हवी असेल, तर तरुणांनी प्रतिदिन १२ घंटे म्हणजे आठवड्याचे ७० घंटे काम करावे, त्यामुळे देश गेले २ दशके आघाडीवर असलेल्या देशांशी स्पर्धा करू शकेल. काहींनी माझ्या या विधानाला विरोध केला; परंतु विदेशातील भारतियांनी माझ्या या विधानाचे स्वागत केले. दुसर्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी येथील लोकांनी असेच केले होते. आपल्याकडे शेतकरी, अंगमेहनत करणारे लोक पुष्कळ काम करतात. भारतात अधिक कष्ट करणे, ही सामान्य गोष्ट आहे.