मुंबई आणि जुहू विमानतळ ३ दिवस १ घंटा बंद !

मुंबई – भारतीय हवाई दलाच्या वतीने मरिन ड्राईव्ह येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत हवाई प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळी हा विशेष कार्यक्रम होणार असल्याने कोणत्याही विमानाचे उड्डाण अथवा लँडिंग या वेळेत होणार नाही. या पार्श्वभूमीवर ३ दिवस दुपारी १ घंट्यासाठी मुंबई विमानतळ आणि जुहू विमानतळ बंद राहील. हा १ घंटा वगळता नियमितच्या विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.