पुणे – पाषणमधील एकनाथनगर भागात भेसळयुक्त तूप सिद्ध करणार्या एका पत्र्याच्या खोलीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी धाड टाकली. त्या वेळी ७०० किलो भेसळयुक्त तूप आणि त्याची विक्री करणार्या सांगसिंग राजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथनगर येथे भेसळयुक्त तूप सिद्ध केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. (अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणार्यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम ! – संपादक)