एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार

या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये नेहरू यांना मोठे करण्यात आले. ‘नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करावा’, असे त्यांचे एकही काम नाही. नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे ही, भारतियांची फसवणूक आहे.

सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

गणपति असो, दहीहंडी असो, नवरात्रोत्सव, रामजन्माचा उत्सव असो की हिदूंच्या अन्य देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत; परंतु सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून व्यक्त केली आहे.

नाशिक येथे कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प !

संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरून राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यापेक्षा वैध मार्गाने मागण्या कराव्यात !

स्‍वच्‍छता – वर्षभराचे अभियान !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्‍वच्‍छतेच्‍या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

नागपूर आणि धुळे येथील २ सहकारी सूतगिरण्यांवर आयकर विभागाच्या धाडी !

येथील तुकाराम उपाख्य बंडू किसन तागडे यांच्या ‘मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणी’वर नागपूर येथील आयकर विभागाने ३० सप्टेंबर या दिवशी धाड घातली. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवरही धाड घालण्यात आली आहे.

हिंदु वारसा मास !

ऑक्‍टोबर मास हिंदूंसाठी विशेष आहे. या मासात नवरात्री आणि दिवाळी हे दोन मोठे सण येतात. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या जॉर्जिया राज्‍याने ‘ऑक्‍टोबर’ या मासाला अधिकृतपणे ‘हिंदु हेरिटेज मंथ’ (हिंदु वारसा मास) म्‍हणून घोषित केले आहे.

मिरज येथे गणेशोत्सव मंडळांची उत्साही वातावरणात आणि शांततेत २४ घंटे मिरवणूक !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरज येथे शांततेत श्री गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडली. अनुमाने १७३ श्री गणेशमूर्तींचे येथील गणेश तलावात विसर्जन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १ लाख ४६ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन !

एकीकडे महानगरपालिका नदीपात्रात विसर्जन करण्‍यास बळजोरीने बंदी घालते, तर दुसरीकडे याचा अपलाभ घेत मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन हौद, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र, असे धर्मद्रोही पर्याय भाविकांवर लादून त्यांच्याकडून मूर्तीदान घेऊन अवैधपणे त्या मूर्तींच्या विक्रीचा घाट घातला जातो….