पुणे येथील चामुंडामातेच्‍या मंदिरातून देवीच्‍या अंगावरील दागिन्‍यांची चोरी !

राज्‍यात काय किंवा देशात काय, कुठे ना कुठेतरी मंदिरात चोरी झाल्‍याची घटना नित्‍याचीच झाली आहे. मंदिरातील चोर्‍या थांबवण्‍यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत हीच भाविकांची अपेक्षा !

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे अस्तित्व पडताळण्यासाठी भूमीचे उत्खनन करा !

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी पाडले. सध्या तेथे मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे आणि याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे संबोधले जाते.

यापुढे किनारपट्टी भागात घरे बांधता येणार आणि व्‍यवसायही करता येणार !

सुधारित आराखड्यामुळे ही अनुमती मिळणे सुलभ होणार आहे. निवासी घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्‍थानिक नियोजन प्राधिकरण अनुमती देणार आहे.

कृत्रिम मांजा बनवणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणार !

कृत्रिम मांजामुळे होणारे वाढते मृत्‍यू रोखण्‍यासाठी राज्‍यशासनाचा निर्णय ! मुंबई, २५ ऑगस्‍ट (वार्ता.) – पतंग उडवण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या कृत्रिम मांजामुळे राज्‍यात काही नागरिकांच्‍या मृत्‍यूच्‍या घटना घडल्‍या आहेत. मांजामुळे प्रतिवर्षी राज्‍यात शेकडो पक्ष्यांचा मृत्‍यू होतो. या घटना रोखण्‍यासाठी प्‍लास्‍टिक आणि सिंथेटिक धाग्‍यांची निर्मिती करणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणारी कार्यप्रणाली राज्‍यशासनाने सिद्ध केली आहे. याविषयी २५ … Read more

सोलापूर जिल्‍ह्यातील गोवंशियांचा बाजार बंद करण्‍याचा निर्णय !

राज्‍यामध्‍ये गोवंशियांचा लंपी आजार पुन्‍हा डोके वर काढत असल्‍याने सोलापूर जिल्‍ह्यातील सर्व गोवंशियांचा बाजार बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण तात्‍काळ जमीनदोस्‍त करा ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

गड-किल्‍ल्‍यांवर झालेल्‍या अतिक्रमणावर प्रशासन स्‍वतःहून कारवाई कधी करणार ?

हत्‍येच्‍या उद्देशाने गायींना बांधून ठेवल्‍याच्‍या प्रकरणी २ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

गोवंशहत्‍याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्‍यक !

सोलापूर येथील ‘अ‍ॅडव्‍हेंचर पार्क’ परिसरात कचर्‍याची दुर्गंधी !

कचराही वेळेत न उचलणारे प्रशासन काय कामाचे ?

मुख्‍यमंत्र्यांचे आदेश न्‍यायालयाकडून रहित !

नाशिक कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमधील कथित धान्‍यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत १ कोटी १६ लाख रुपयांच्‍या आर्थिक हानी प्रकरणी यापूर्वी मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले आदेश उच्‍च न्‍यायालयाने रहित ठरवले आहेत. याविषयी ‘पणनमंत्र्यांनी पुन्‍हा सुनावणी घ्‍यावी’, असे आदेशही न्‍यायालयाने २४ ऑगस्‍ट या दिवशी दिले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर येथे आधुनिक वैद्य तरुणीची छेड काढणार्‍याला अटक !

शहरातील कनॉट प्‍लेस परिसरामध्‍ये पायी जाणार्‍या २ आधुनिक वैद्य तरुणींची भर रस्‍त्‍यात छेड काढून अश्‍लील शेरेबाजी करणारा संदीप कांबळे (वय ३० वर्षे) याला सिडको पोलिसांनी अटक केली.