विद्यार्थ्‍यांवर घराच्‍या ओट्यावर बसून शिकण्‍याची वेळ !

विक्रमगड (पालघर) येथील घटना !

विक्रमगड (पालघर) – विक्रमगड तालुक्‍यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्‍हा परिषदेच्‍या इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्‍या शाळेत ८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे; मात्र शाळेची एक इमारत कोसळली असल्‍याने विद्यार्थ्‍यांना एका घराच्‍या ओट्यावर बसून शिकावे लागत आहे. या विद्यार्थ्‍यांची योग्‍य ती सोय न केल्‍यास विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांना समवेत घेऊन शिक्षण विभागाच्‍या विरोधात येत्‍या १४ ऑगस्‍टपासून मनसे उपोषण करू, अशी चेतावणी मनसेचे विक्रमगड तालुका अध्‍यक्ष योगेश पाटील यांनी दिली.