अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला प्रारंभ

१३ ते ७० वयोगटातील लोक करू शकतात नोंदणी !

अमरनाथ यात्रा

नवी देहली – अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात. देशभरातील ३१ बँकांच्या ५४२ शाखांमध्ये ऑफलाईन (प्रत्यक्ष जाऊन) नोंदणी करता येणार आहे, तर ऑनलाईन नोंदणी अमरनाथ यात्रेच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. ऑफलाईन नोंदणीसाठी प्रति व्यक्ती १२० रुपये, तर ऑनलाईन नोंदणीसाठी २२० रुपये भरावे लागणार आहेत. गट नोंदणीसाठी प्रति व्यक्ती २२० रुपये, तसेच अनिवासी भारतियांसाठी १ सहस्र ५२० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणी करतांना भाविकांना पारपत्र आकाराचे छायाचित्र, ओळखपत्राची प्रत, वैद्यकीय प्रमाणपत्र आदी माहिती द्यावी लागणार आहे. ही यात्रा १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आहे.