श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंना केंद्रशासन जर अल्पसंख्यांकांचा दर्जा देत असेल, तर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला त्यावर कोणताही आक्षेप नाही, असे मत या आयोगाच्या सदस्या सईद शहजादी यांनी व्यक्त केले आहे.
१. सईद शहजादी म्हणाल्या की, जर संसदेने कायदा करून हिंदूंना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याचे ठरवले असेल, तर सरकारचा तो अधिकार आहे. हीच आमची भूमिका आहे.
‘एखाद्या समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यावा का ?’, हे ठरवण्याचा अधिकार आयोगाकडे नाही. जेव्हा गृह विभागाने याविषयी आमचे मत विचारले, तेव्हादेखील आम्ही हाच अभिप्राय त्यांना दिला. संसदेनेच पुढे येऊन याविषयी कायदा करावा आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय द्यावा. गृह विभाग आणि आयोगाचे अध्यक्ष यांनीही यावर चर्चा केली असून ‘कायदा करावा’, असेच त्यांचेही मत आहे.
२. आम्ही सरकारला पत्र लिहून केंद्रशासित प्रदेशामध्येही राज्य अल्पसंख्यांक आयोग स्थापन करावा, अशी मागणी करणार आहोत. तसेच आम्ही इतर राज्यांनाही पत्र लिहून यविषयी विनंती करणार आहोत. देशातील प्रत्येक राज्यात आयोग असलाच पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.