ट्रकची तपासणी केल्याच्या रागातून आक्रमण : ४४ जणांना अटक
पाटलीपुत्र (बिहार) – येथे वाळू माफिया आणि त्यांच्या हस्तकांनी १७ एप्रिल या दिवशी सरकारी अधिकार्यांवर आक्रमण केले. यात खाण अधिकारी, तसेच महिला खाण निरीक्षक यांचा पाठलाग करण्यात आला. त्यामुळे ते पळून जाऊ लागले. यात महिला निरीक्षकाला माफियांनी पकडले आणि अमानुष मारहाण केली. या मारहाणीत २ अधिकारी घायाळ झाले असून उपचारार्थ त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४४ जणांना अटक केली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
परेव गावात १७ एप्रिलला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खाण विभागाच्या पथकाला प्रमाणापेक्षा अधिक वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर ते ट्रकची तपासणी करण्यासाठी पोचले होते. तेव्हा त्यांचा ट्रकचालकांशी वाद झाला आणि या चालकांनी त्यांच्यावर दगडफेक चालू केली. त्यामुळे पथकातील अधिकारी पळू लागल्यावर त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. या वेळी १५० ट्रक पकडण्यात आले होते; मात्र या आक्रमणानंतर माफियांनी ते सोडवून घेतले.
संपादकीय भूमिका
|