बांगलादेशाची विचार स्वातंत्र्याविषयीची भूमिका भयावह ! – तस्लिमा नसरीन

लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – ‘बांगलादेशातील न्यायाधीश इमान अली शेख यांनी ‘मी अल्लावर विश्‍वास ठेवत नाही’, असे म्हटल्याने त्यांचे स्थानांतर करण्यात आले. देशातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सेलिना अख्तर यांनी ‘रमझान हा शब्द मला रामाची आठवण करून देतो’, असे म्हटल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. बांगलादेश सरकारकडून धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली देण्यात येणारी शिक्षा ही विचार स्वातंत्र्यविरोधी आणि भयावह आहे’, असे ट्वीट सध्या देहलीत वास्तव्य करणार्‍या मूळच्या बांगलादेशातील प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

संपादकीय भूमिका

एरव्ही भारतात अभिव्यक्ती अथवा विचारस्वातंत्र्य यांची गळचेपी होत असल्याची आवई उठवणारे पुरो(अधो)गामी हे बांगलादेश, पाकिस्तान यांसारख्या इस्लामी देशांतील घडामोडींकडे कानाडोळा करतात. यातून त्यांच्यातील पुरोगामित्वाचा फोलपणा लक्षात येतो !