‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आपले सर्वस्व आहेत’, असा भाव असलेले (कै.) पू. पद्माकर होनप !

२७.३.२०२२ (चैत्र शुक्ल षष्ठी) या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित !

अधिवेशनात राज्यात अर्थसंकल्प संमत होण्यासमवेतच विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात सत्ताधार्‍यांनी कामकाज रेटून नेले, तसेच या अधिवेशनात संपूर्ण काळ सत्ताधार्‍यांचा वरचष्मा पहायला मिळाला.

मुंब्रा स्थानकात उतरलेल्या गर्दुल्ल्याने लोकलगाडीत प्रवाशावर जळता रूमाल फेकला, प्रवासी घायाळ

एका गर्दुल्ल्याने (नशेचे पदार्थ न मिळाल्यास वेडेपिसे होणारे) नशेसाठी वापरणारे द्रव्य रुमालावर टाकून त्याला आग लावली आणि तो रुमाल प्रमोद वाडेकर या दिव्यांग प्रवाशावर टाकला.

हिंदुत्व रक्षणासाठी जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदे आवश्यक ! – ह.भ.प. गणपत महाराज येसरे

हिंदुत्व रक्षणासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात आणि धर्मांतरबंदी यासाठी कायदा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी केले.

हिंदुद्रोही असणारा वक्फ कायदा त्वरित रहित करावा, या मागणीसाठी बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

बेळगाव येथील अन्य भागांतीलही हिंदूंची भूमी वक्फ बोर्डाकडून बळकावण्यात आली आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा

पुणे येथे ‘एच्.३ एन्.२’चे २२ रुग्ण !

‘इन्फ्लुएंझा ए’ विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच्.३ एन्.२’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा अहवाल ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने दिला आहे.

कांजूरमार्गमध्ये म्हाडा वसाहतीतील इमारतीला आग

कर्वेनगरमधील म्हाडा वसाहतीतील १५ मजली इमारतीला २६ मार्च या दिवशी सकाळी शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या येथे आल्यावर त्यांनी १ घंट्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महाद्वार चंद्रपूर येथील सागवान काष्ठापासून साकार होणार !

२९ मार्च या दिवशी विधीवत् पूजन करून हे काष्ठ अयोध्येसाठी पाठवण्यात येणार आहे. घराघरांतून या काष्ठावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

उद्या संशयित आरोपी आंबेरकरच्या जामीन प्रकरणाची होणार सुनावणी !

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने १ मार्च या दिवशी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या २८ मार्च या दिवशी होणार आहे.

परशुराम घाट महामार्गाच्या कामासाठी पुन्हा होणार बंद ?

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. परशुराम घाटातील महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, या दृष्टीने हा घाटमार्ग एक आठवडाभर (२७ मार्च ते ३ एप्रिल) बंद करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.