कांजूरमार्गमध्ये म्हाडा वसाहतीतील इमारतीला आग

कांजूरमार्ग – येथील कर्वेनगरमधील म्हाडा वसाहतीतील १५ मजली इमारतीला २६ मार्च या दिवशी सकाळी शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या येथे आल्यावर त्यांनी १ घंट्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत आगीच्या धुरामुळे काही नागरिकांचा श्वास गुदमरला. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. यानंतर नागरिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.