उद्या संशयित आरोपी आंबेरकरच्या जामीन प्रकरणाची होणार सुनावणी !

राजापूर येथील पत्रकार वारीशे यांच्या अपघाताचे प्रकरण

रत्नागिरी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने १ मार्च या दिवशी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या २८ मार्च या दिवशी होणार आहे.

रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात येत आहे. पत्रकार वारीशे यांच्या अपघाताच्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला होता. पत्रकार वारीशे हे बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधात भूमिका मांडत होते, तर आरोपी आंबेरकर रिफायनरी समर्थक आहेत. आंबेरकर याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३०२ , तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.