पुणे येथे ‘एच्.३ एन्.२’चे २२ रुग्ण !

पुणे – ‘इन्फ्लुएंझा ए’ विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच्.३ एन्.२’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा अहवाल ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. लक्षणे ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहेत. नुकतीच ‘एच्.३ एन्.२’ विषाणूच्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.  मुंबई, ठाणे, पुणे या भागांत अधिकाधिक लक्ष ठेवण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे, राज्यात अद्यापही कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.