अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्या पावन पादुकांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन !

‘फेब्रुवारी २०२३ मध्‍ये म्‍हापसा येथे झालेल्‍या सोमयागात अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील थोर संत आणि परम सद़्‍गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् त्‍यांच्‍या चरणपादुका घेऊन त्‍यांचे भक्‍तगण सहभागी झाले होते.

लहान वयातच भावाच्‍या स्‍तरावर दैवी बालकांचा सत्‍संग घेणारी पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) !

तिच्‍या बोलण्‍यात पुष्‍कळ माधुर्य आहे. ‘तिचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते. तिच्‍या बोलण्‍यातील गोडवा शब्‍दांत वर्णन करण्‍याच्‍या पलीकडे आहे.

पंतप्रधानांविषयी खोटी माहिती प्रसारित करणार्‍या ‘बीबीसी’वर कारवाई करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

या वेळी ‘हिंदु धर्म, देवीदेवता, ग्रंथ  आणि थोर राष्‍ट्रपुरुष यांचा अवमान थांबवण्‍यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्‍यात यावा’, अशीही मागणी वरील निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करतांना कु. स्‍मितल भुजले यांना आलेल्‍या अनुभूती

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, मी तुम्‍हाला मला आलेल्‍या भगवान शिवाशी संबंधित सर्व अनुभूती सांगितल्‍या होत्‍या. तेव्‍हा तुम्‍ही मला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला होता. त्‍याबद्दल आणि तुमच्‍या कृपेने मला आलेल्‍या अनुभूती तुमच्‍या चरणी अर्पण करून मी कृतज्ञता व्‍यक्‍त करत आहे. 

दळणवळण बंदीच्‍या काळात नियमित अग्‍निहोत्र केल्‍याने कोरोनाचा संसर्ग न होणे

दळणवळण बंदीच्‍या काळात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे नियमित अग्‍निहोत्र केल्‍याने माझा भाऊ, भावजय आणि भाची यांना कोरोनाची लागण झाली नाही.

श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकटदिन भक्‍तीमय वातावरणात साजरा !

१३ फेब्रुवारी या दिवशी श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकटदिन होता. महाराजांनी वर्ष १९१० मध्‍ये संजीवन समाधी घेतली होती. दासगणू महाराजरचित श्रीविजय ग्रंथात संत गजानन महाराज प्रकट झाले तो क्षण ‘गावी माघमासी । वद्य सप्‍तमी त्‍या दिवशी। हा उदय पावला ज्ञानराशी ॥ पदनताते तारावया।’ असा शब्‍दबद्ध करण्‍यात आला आहे.

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घाला ! – राष्‍ट्रप्रेमींची मागणी

राष्‍ट्रविरोधी हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या वतीने रणधीर वर्मा चौकामध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तान्त . . .

‘जिव्‍हाळा फाऊंडेशन’ला यंदाचा आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्‍कार घोषित !

‘सांगली जिल्‍हा नगर वाचनालया’च्‍या वतीने देण्‍यात येणारा आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्‍कार यंदाच्‍या वर्षी बुधगाव येथील ‘जिव्‍हाळा फाऊंडेशन’चे संस्थापक श्री.प्रशांत मुळीक यांना घोषित करण्‍यात आला आहे.

जात, धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी कार्य करा ! – अण्‍णासाहेब मोरे, अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख

जाती आणि धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी निःस्‍वार्थीपणे कार्य केल्‍यास प्रत्‍येक घराघरात श्रावणबाळ आणि भक्‍त पुंडलिक सिद्ध होतील. सुखी आणि आरोग्‍यदायी जीवन जगायचे असेल तर न्‍यूनतम अपेक्षा, गरजा ठेवाल तर समाधानाने जीवन जगू शकाल….