दळणवळण बंदीच्‍या काळात नियमित अग्‍निहोत्र केल्‍याने कोरोनाचा संसर्ग न होणे

१. साधिकेने पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांनी प्रेरणा दिल्‍यामुळे अग्‍निहोत्र करणे

‘मी सेवेनिमित्त पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांच्‍याकडे संध्‍याकाळी जात होते. तेव्‍हा त्‍या अग्‍निहोत्र करत असत. त्‍या अग्‍निहोत्र करतांना पाहून ‘आपणही अग्‍निहोत्र करायला पाहिजे’, असे मला वाटायचे. त्‍या वेळी माझ्‍या मनात यायचे, ‘सूर्योदयाच्‍या आधी उठून अंघोळ करून अग्‍निहोत्र करायला आणि संध्‍याकाळच्‍या वेळी अग्‍निहोत्र करायला मला जमणार नाही.’ तेव्‍हा मी वर्ष २०१९ मध्‍ये पू. परांजपेआजींना सांगितले, ‘‘मला अग्‍निहोत्र करायचे आहे; परंतु ते करतांना मला अडचणी आहेत.’’ तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘सकाळी अंघोळ करून अग्‍निहोत्र करावे, असे बंधन नाही.’’ त्‍यानंतर मी जसे जमेल, तसे सकाळी किंवा संध्‍याकाळी अग्‍निहोत्र करू लागले. (‘हे अग्‍निहोत्र कर्मकांडाच्‍या अंतर्गत नसून केवळ उपाय म्‍हणून (वास्‍तूशुद्धीसाठी) संतांच्‍या आज्ञेने केले जाते. त्‍यामुळे त्‍याला पुष्‍कळ बंधने पाळायला हवीत, असे नाही. खरे अग्‍निहोत्र आणि यात पुष्‍कळ भेद आहे.’ – पुरोहित श्री. अमर जोशी)

२. साधिका आणि तिची बहीण यांनी कोरोना काळात नियमित अग्‍निहोत्र करणे

अधिवक्त्या प्रीती पाटील

मार्च २०२० मध्‍ये कोरोनाच्‍या महामारीमुळे दळणवळण बंदी लागू झाली. त्‍या काळात आम्‍ही सगळेच (माझी बहीण, भाऊ, वहिनी आणि भाची ) माझ्‍या आई-बाबांच्‍या (श्री. रमेश राजमाने (वय ८२ वर्षे) आणि सौ. शैलजा राजमाने (वय ७० वर्षे) यांच्‍या) घरी सांगलीला रहात होतो. तेव्‍हा मी किंवा माझी बहीण (सौ. गायत्री मगदूम) सकाळी आणि संध्‍याकाळी नियमित अग्‍निहोत्र करत होतो. त्‍या वेळी माझ्‍या लहान भावाची मुलगी कु. सिद्धी प्रसाद राजमाने (वय ४ वर्षे) माझ्‍यासमवेत अग्‍निहोत्र करत होती.

३. साधिकेचा लहान भाऊ त्‍याच्‍या सदनिकेत रहायला जाणे आणि त्‍याच्‍या खालच्‍या माळ्‍यावर रहाणार्‍या आजोबांना कोरोना झाल्‍याचे समजणे

माझा भाऊ (श्री. प्रसाद रमेश राजमाने) जून २०२० मध्‍ये त्‍याच्‍या सदनिकेत रहाण्‍यास गेला. तेव्‍हा त्‍याला १५ दिवसांनी समजले, ‘त्‍याच्‍या खालच्‍या माळ्‍यावर रहाणार्‍या आजोबांना कोरोना झाला आहे.’ त्‍या वेळी माझ्‍या भावाला पुष्‍कळ ताण आला; कारण त्‍याची मुलगी (सिद्धी) त्‍या आजोबांच्‍या नातीशी खेळायला जात होती. भाऊही जाता-येता त्‍या आजोबांशी बोलत असे. माझे आई-बाबा आणि मोठा भाऊ (श्री. प्रमोद राजमाने) यांना मधुमेह आहे, तसेच आई-बाबा वयस्‍कर आहेत. त्‍यामुळे भावाला ‘काय करायचे ?’, असा प्रश्‍न पडला. मी माझ्‍या बाबांशी बोलले आणि सिद्धीला घरी घेऊन आले. नंतर मी भावाला सांगितले, ‘‘जसे असेल, तसे आपण एकत्रच राहून निर्णय घेऊया.’’ नंतर माझा भाऊ आणि त्‍याची पत्नी (सौ. शुभदा) त्‍यांच्‍या घरातील आवरून पुन्‍हा आई-बाबांच्‍या घरी रहायला आले.

४. साधिकेच्‍या लहान भावाच्‍या कुटुंबाला रुग्‍णालयात कोरोनाची चाचणी करण्‍यास बोलावणे आणि त्‍यांचा कोरोना चाचणीचा अहवाल कोरोना नसल्‍याचा येणे

माझा लहान भाऊ, भावजय आणि भाची यांना दुसर्‍या दिवशी रुग्‍णालयात कोरोनाची चाचणी करायला बोलावले होते. ते तिघेही दुपारी रुग्‍णालयात गेले. त्‍यांनी भ्रमणभाषवरून कोरोना नसल्‍याचे कळवले. ते घरी आल्‍यावर माझ्‍या वहिनीने (सौ. शुभदाने) मला सांगितले, ‘‘तुम्‍ही करत असलेला नामजप, अग्‍निहोत्र आणि कडुलिंबाची धुरी’ यांमुळेच आम्‍हाला कोरोनाची लागण झाली नाही. आधुनिक वैद्य आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘आम्‍ही सकाळपासून १०० हून अधिक जणांची कोरोनाची तपासणी केली. त्‍यामध्‍ये सगळ्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाल्‍याचे लक्षात आले. केवळ तुमच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींच्‍या कोरोना चाचणीचा अहवाल कोरोना नसल्‍याचा आला.’’

५. मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. केवळ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे माझा भाऊ, भावजय आणि भाची यांना कोरोनाची लागण झाली नाही. ‘गुरुमाऊली, कितीही भीषण आपत्‍काळ असला, तरीही तुम्‍ही आम्‍हाला अलगद बाजूला केले आहे’, याची मला जाणीव झाली.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक