श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकटदिन भक्‍तीमय वातावरणात साजरा !

सौजन्य : ABP माझा

शेगाव – १३ फेब्रुवारी या दिवशी श्री गजानन महाराजांचा १४५ वा प्रकटदिन होता. महाराजांनी वर्ष १९१० मध्‍ये संजीवन समाधी घेतली होती. दासगणू महाराजरचित श्रीविजय ग्रंथात संत गजानन महाराज प्रकट झाले तो क्षण ‘गावी माघमासी । वद्य सप्‍तमी त्‍या दिवशी। हा उदय पावला ज्ञानराशी ॥ पदनताते तारावया।’ असा शब्‍दबद्ध करण्‍यात आला आहे. शेगावात १३ फेब्रुवारी या दिवशी लाखो भाविक उपस्‍थित होते. १ सहस्र १०० भजनी दिंड्या आल्‍या होत्‍या. संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. राज्‍यातील अन्‍य शहरांमध्‍येही गजानन महाराजांचा प्रगटदिन अत्‍यंत भक्‍तीमय वातावरणात साजरा झाला.