भगवंतच आतुर होई भेटी लागूनी ।

श्री. धैवत वाघमारे

चालता चालता, दिसली पाऊले ।
कुतूहल मनी, माझ्‍या जागले ॥ १ ॥

दिसेल का हरि, आस मनी जागे ।
हुरहुर वाटे कधी, पाहीन रामरूपे ॥ २ ॥

शब्‍द माझ्‍या, कानी पडले ।
विसरलास का, मज हरि विचारे ॥ ३ ॥

भगवंत क्षणोक्षणी, माझी वाट पाहे ।
ऐकोनी वचन, हतबुद्ध मन जाहले ॥ ४ ॥

कंपने सुटली, मम देहास ।
कोरडा होई, माझा श्‍वास ॥ ५ ॥

कृपा तयाची, आठवूनी मनी ।
नेत्र पाणावती, आसवे ओघळती ॥ ६ ॥

ठेविले तुवा, मज स्‍मरणात ।
मी तर भुललो भवसागरात ॥ ७ ॥

भगवंतच आतुर होई, भेटी लागूनी ।
फुकाचा अहं पोसतो, मी मनी ॥ ८ ॥

वचने तुझी, आठविता ।
चिंब न्‍हाले मन, तव स्‍मरणात ॥ ९ ॥

कृतज्ञ आहे चरणी, हरीचा दास ।
घेतले तुवा शरण, या जिवास ॥ १० ॥

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२३)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक