सांगली, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘सांगली जिल्हा नगर वाचनालया’च्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके, तसेच अन्य देणगीदार यांच्या सहयोगातून देण्यात येणारा आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्कार यंदाच्या वर्षी बुधगाव येथील ‘जिव्हाळा फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. प्रशांत मुळीक यांना घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा नगर वाचनालय येथे देण्यात येईल. तरी नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत जोशी, तसेच श्री. शरद फडके यांनी केले आहे.
‘जिव्हाळा फाऊंडेशन’चे कार्य
बुधगाव येथील ‘जिव्हाळा फाऊंडेशन’ ही संस्था वर्ष २०१७ पासून सांगली जिल्ह्यात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका, मुक्तद्वार वाचनालय, आयुर्वेदिक बाग, वृक्ष संवर्धन, स्वदेशी वस्तूंविषयी जनजागृती यांसह अन्य उपक्रम राबवले जातात.