कळंबा (जिल्‍हा कोल्‍हापूर) कारागृहात बंदीवानाने केलेल्‍या आक्रमणात दुसर्‍या बंदीवानाचा मृत्‍यू !

गणेश गायकवाड याने सतपालसिंह याच्‍या डोक्‍यात मध्‍यरात्री दगड घातल्‍याने तो गंभीर घायाळ झाला होता. त्‍याला शासकीय रुग्‍णालयात उपचारांसाठी भरती करण्‍यात आले होते; मात्र त्‍याचा उपचाराच्‍या कालावधीत मृत्‍यू झाला.

परदेशी विद्यापिठांना भारतात शिक्षण संकुल उभारणे आव्‍हानात्‍मक !

प्रा. गणेश म्‍हणाले की, विद्यापीठ चालू करण्‍यासाठी भूमीपासून ते पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक अनुमती घेण्‍याची प्रक्रिया ही फार पुष्‍कळ आहे. येथील कार्यसंस्‍कृती आणि प्रशासन समजणे अवघड आहे. त्‍यापेक्षा भारतीय विद्यापिठांशी करार करत अभ्‍यासक्रम राबवणे सोपे होईल.

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन मारामार्‍या होऊ नयेत; म्‍हणून वाचन केले पाहिजे ! – नागराज मंजुळे, दिग्‍दर्शक

गेल्‍या ६० वर्षांत पुष्‍कळ कविता-कादंबर्‍या झाल्‍या. त्‍यापेक्षा झाडे लावली, तर ते आपल्‍याला प्राणवायू देतात. वलयांकित माणसे आपल्‍याला अन्‍न-पाणी देत नाहीत. त्‍यामुळे झाडे जपली पाहिजेत, असे विधान अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्‍हटले. यावर चित्रपट दिग्‍दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रत्‍युत्तर दिले.

सातारा येथील शिकवणीवर्गात कोयत्‍याने दहशत माजवण्‍याचा प्रयत्न !

शिकवणीवर्गात कोयता आणण्‍यापर्यंत विद्यार्थ्‍यांची मजल जाणे, हे कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचे लक्षण !

वाचन संस्‍कृतीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी मुंबई महापालिका प्रकाशकांना जागा देणार

२७ फेब्रुवारीला (मराठी भाषादिनाच्‍या दिवशी) उपक्रमाला प्रारंभ !

संभाजीनगर येथे अवैध गर्भपात; डॉक्‍टर दांपत्‍य पसार !

अवैध गर्भपात करण्‍यावर बंदी असतांनाही आधुनिक वैद्यांनी रुग्‍णांच्‍या जिवाशी खेळणे संतापजनक आहे. अशा आधुनिक वैद्यांना आणि त्‍यांना असे करायला सांगणार्‍या रुग्‍णांनाही कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे !

कोल्‍हापूर येथून सुटणार्‍या दोन पॅसेंजर रेल्‍वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित

या गाड्या रहित झाल्‍याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्‍सप्रेस, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस, तसेच कोल्‍हापूर-कलबुर्गी एक्‍सप्रेस याच गाड्या उपलब्‍ध आहेत. याचसमवेत कोल्‍हापूर-हरिप्रिया ही रेल्‍वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्‍कळ हाल होणार आहेत.

आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ सोहळा पुढे ढकलला !

पुरस्‍कारप्राप्‍त सन्‍माननीय बाबा महाराज सातारकर यांच्‍या पत्नीचे दुःखद निधन झाल्‍यामुळे ते कार्यक्रमाला उपस्‍थित राहू शकणार नाहीत..

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले