सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – काही दिवसांपूर्वीच येथील महाराजा सयाजीराव विद्यालयासमोर काही युवकांनी कोयते नाचवून दहशत निर्माण केली होती. त्याची पुनरावृत्ती १ फेब्रुवारी या दिवशी येथे एका शिकवणीवर्गात झाली. ६ जणांनी कोयता दाखवून केली. याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. शिकवणीवर्गात पार्थ निकम याने समवेतच्या ५ अल्पवयीन मुलांसह अंन्शुल कोदे याच्या बाकावर कोयता आपटून त्याला भीती दाखवली. नंतर त्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली.
संपादकीय भूमिकाशिकवणीवर्गात कोयता आणण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल जाणे, हे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण ! |