सातारा येथे आंबेघर-भोगवली सोसायटीमध्‍ये ८४ लाख ३९ सहस्र रुपयांचा घोटाळा !

जावळी तालुक्‍यातील आंबेघर-भोगवली येथील ‘विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्‍थे’त ८४ लाख ३९ सहस्र २७९ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी सोसायटीचे सचिव अजित तुकाराम रांजणे यांच्‍यावर मेढा पोलीस ठाण्‍यात फसवणुकीचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर मारहाणीचा गुन्‍हा नोंद

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर पत्नीला मारहाण केल्‍याचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली होती.

असे लोकप्रतिनिधी देशाचे काय भले करणार ?

‘संस्कृतमध्ये ‘समानशीले व्यसनेषु सख्यम् ।’, म्हणजे, ‘समान गुणदोष असतांना, तसेच संकटाच्या वेळी एकमेकांची मैत्री होते’ असे एक सुभाषित आहे. या सिद्धांतानुसार जनता रज-तमप्रधान असल्याने निवडणुकीत निवडून येणारे जनतेचे प्रतिनिधी तसेच असतात ! ते देशाचे काय भले करणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्‍यागपत्र !

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष, माजी महसूलमंत्री आणि सध्‍याच्‍या विधीमंडळातील सर्वांत वरिष्‍ठ सदस्‍य असणारे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्‍यागपत्र सुपुर्द केले आहे. वरिष्‍ठ असूनही मान राखला जात नसल्‍याचे सांगत त्‍यांनी त्‍यागपत्र दिले.

सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या ! – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषद 

ज्‍यांच्‍या प्रयत्नांमुळे श्रीराममंदिर बनत आहे, त्‍यांना ‘भारतरत्न’ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ऋणमुक्‍ती मिळवावी, असे प्रतिपादन प्रवीण तोगाडिया यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केले.

‘जी-२०’च्‍या निमित्त संभाजीनगर शहरातील मुख्‍य रस्‍ते चांगल्‍या प्रकारे दुरुस्‍त; मात्र अंतर्गत रस्‍त्‍यांची दुरवस्‍था कायम !

ज्‍या अर्थी जी-२०च्‍या निमित्त रस्‍त्‍यांची कामे होऊ शकतात, तर अन्‍य वेळी का होत नाहीत ? देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली तरी नागरिकांनी कर भरूनही त्‍यांना मुलभूत सुविधा न मिळणे, हे शोकांतिका आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या उपस्‍थितीत मलंगगडावर उत्‍सव साजरा !

मलंगगडावरील हिंदूंंची वहिवाट आणि तेथील धार्मिक परंपरा जपण्‍यासाठी शिवसेनेचे दिवंगत जिल्‍हाप्रमुख आनंद दिघे यांनी वर्ष १९८० पासून येथे माघी पौर्णिमेनिमित्त उत्‍सवाला आरंभ केला.