मुंबई – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री आणि सध्याच्या विधीमंडळातील सर्वांत वरिष्ठ सदस्य असणारे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्यागपत्र सुपुर्द केले आहे. वरिष्ठ असूनही मान राखला जात नसल्याचे सांगत त्यांनी त्यागपत्र दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून वाढला. सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे नातेवाईक आहेत. पक्षविरोधी काम केल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांचे निलंबन केले. बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात ही कारवाई होत असतांना त्यांचे मत विचारात घेण्यात आले नाही. यामुळे त्यांच्यातील रोष अधिक वाढला.
‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असे त्यागपत्र द्यावे लागणे, हे दुर्दैवी आहे. जर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊ पहात असतील, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही त्यांना मानसन्मान देऊ’, असे भाजपने म्हटले आहे.