प्रजासत्ताक भारताचे आगामी संरक्षण धोरण !

‘देशाच्‍या सुरक्षेची विभागणी बाह्य सुरक्षा (भूमी आणि समुद्री सीमा), अंतर्गत सुरक्षा (काश्‍मीरमधील आतंकवाद, नक्षलवाद, बांगलादेशी घुसखोरी, ईशान्‍य भारतातील बंडखोरी, अमली पदार्थांची तस्‍करी यांपासून सुरक्षा) आणि अवकाश सुरक्षा या ३ भागांमध्‍ये करता येईल.

बनावट शाळांना अटकाव हवाच !

राज्‍यात ७५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी हे मदरसा आणि अमान्‍यताप्राप्‍त शाळांमधून शिक्षण घेत आहेत, ही गोष्‍टही गंभीर आहे. अनधिकृत शाळा बंद केल्‍या पाहिजेत; कारण बनावट शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य धोक्‍यात येऊ शकते.

सर्दी, खोकला आणि ताप यांमध्‍ये तुळशीचा उपयोग

‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्‍यात उकळून वाफारा घ्‍यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्‍यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्‍यावा. असे ३ ते ५ दिवस करावे.

वैद्यांनी सखोल आयुर्वेदाध्‍ययन करून ‘सुपरस्‍पेशालिटी’ (विशेष तज्ञ) वैद्य बनणे, ही काळाची आवश्‍यकता !

प्रत्‍येक वैद्याने कोणत्‍याही एका आवडीच्‍या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्‍या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्‍ययन करावे. त्‍या विषयातील ‘सुपरस्‍पेशालिस्‍ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्‍वतः आत्‍मविश्‍वासाने आयुर्वेदानुसार त्‍या रोगाची चिकित्‍सा करावी.

सप्‍तपदीतील शेवटचे अन् सर्वोच्‍च पद : एकमेकांशी आत्‍मसख्‍य करणे

सप्‍तपदीतील शेवटचे पद म्‍हणजे गृहस्‍थ जीवनाचे सार ! ‘तू माझी ‘सखी’ हो एवढा उदात्त विचार आपल्‍या ऋषिमुनींनी दिला आहे. तो आचरावा’, ही प्रार्थना. ‘आम्‍ही’ या शब्‍दात ‘मी’ हे अक्षर येते; परंतु ‘मी’मध्‍ये ‘आम्‍ही’ येत नाही. तेव्‍हा मीपणा सोडून आम्‍ही बनून प्रारंभ करूया.’

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर चक्र’ पुरस्‍कारांनी सन्‍मान करावा ! – जय हिंद सैनिक संस्‍था

मरणोत्तर ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर’ पुरस्‍कार देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्‍मान करावा, अशी मागणी ‘जय हिंद सैनिक संस्‍थे’चे महासचिव जनार्दन जंगले यांनी २० जानेवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केली.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) रुग्‍णाईत असतांना जाणवलेली त्‍यांची सहनशीलता, स्‍थिरता आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धा !

पू. भार्गवराम यांना पुष्‍कळ ताप आला होता. सर्व औषधोपचार करूनही त्‍यांचा ताप उणावत नव्‍हता. त्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात भरती करावे लागले. तेव्‍हा मला त्‍यांची सहनशीलता, समजूतदारपणा, स्‍थिरता आणि गुरुदेवांवरील अतूट श्रद्धा प्रकर्षाने जाणवली. त्‍याविषयीची सूत्रे, तसेच पू. भार्गवराम आणि पू. वामन राजंदेकर यांना एकसारखी आलेली अनुभूती येथे देत आहेत.

संसारातील कर्तव्‍ये आनंदाने पार पाडून गुरुसेवेत रममाण होणार्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !

‘वर्ष २०१२ पासून माझा सौ. मीनाक्षी धुमाळताईंशी सेवेच्‍या निमित्ताने संपर्क आला. त्‍यातून आमची अधिक जवळीक झाली. गुरुदेवांच्‍या कृपेने मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी आश्रमात झालेल्‍या मराठी भाषिक साधना शिबिरातील शिबिरार्थींना आलेल्‍या अनुभूती

२२ ते २४.११.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात ‘मराठी भाषिक साधना शिबिर’ झाले. त्‍या शिबिरात सहभागी झालेल्‍या शिबिरार्थींना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्‍याविषयी श्री. विजय लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे

एक दिवस पू. इंगळेआजोबा मोठ्या आवाजात तेही अनावश्‍यक असे बोलत होते. दुसर्‍या दिवशी त्‍यांचे बोलणे थोडे न्‍यून झाले. त्‍यांचे बोलणे आणि वागणे यांमध्‍ये जो पालट झाला होता, त्‍यावरून ‘त्‍यांना त्‍यांच्‍या देहत्‍यागाची कल्‍पना होती’, असे मला वाटले.