‘सध्याच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये वैद्यांनी ‘सर्व विषयांमध्ये मी निष्णात आहे किंवा सगळ्याच रोगांची मी चिकित्सा करतो’, अशा आवेशात न रहाता ‘सुपरस्पेशालिटी’ वैद्य बनणे, ही काळाची आवश्यकता आहे; पण हे कसे आणि का करायला हवे ?
याचे उत्तर म्हणजे प्रत्येक वैद्याने कोणत्याही एका आवडीच्या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्ययन करावे. त्या विषयातील ‘सुपरस्पेशालिस्ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्वतः आत्मविश्वासाने आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा करावी.
सुपर स्पेशालिटी वैद्य काळाची गरज –
(सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे)
असे केल्याने काळानुरूप निरनिराळ्या रोगांची स्वतंत्रपणे आयुर्वेदाची चिकित्सा करणारे वैद्य सिद्ध होऊन रुग्णसेवेसाठी सज्ज होतील !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (९.१२.२०२२)