कल्‍याण येथे आगीत आजी आणि नात यांचा होरपळून मृत्‍यू !

इमारतीमधील सदनिकेला लागलेली आग 

ठाणे, १८ जानेवारी (वार्ता.) – कल्‍याण येथील एका इमारतीमधील सदनिकेला १७ जानेवारीला पहाटे भीषण आग लागली. त्‍यात खातीजा आजी हसम माईमकर (वय ७० वर्षे) आणि तिची नात इब्रा रौफ शेख (वय २२ वर्षे) यांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे. त्‍या दोघी शयनगृहात गाढ झोपल्‍या होत्‍या. अग्‍नीशमनदलाचे कर्मचारी येईपर्यंत घर आगीच्‍या भक्ष्यस्‍थानी पडले होते.