महिलेची छेड काढणारे संभाजीनगरचे साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त निलंबित !

साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त विशाल ढुमे

संभाजीनगर – येथील शहर पोलीस दलात साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त असलेले विशाल ढुमे यांच्‍यावर एका महिलेचा विनयभंग केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला होता. त्‍यानंतर नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्‍यक्‍त केला जात होता. १८ जानेवारीपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्‍यास २० जानेवारी या दिवशी संभाजीनगर शहर बंद ठेवण्‍याची चेतावणी खासदार इम्‍तियाज जलील यांनी दिली होती. त्‍यामुळे गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्‍यात येत असल्‍याचा आदेश काढला, तसेच ‘निलंबन असेपर्यंत ढुमे यांना संभाजीनगर शहर पोलिसांच्‍या पूर्वअनुमतीविना मुख्‍यालय सोडता येणार नाही’, असेही म्‍हटले आहे.