मुंबई – गुन्हेगारी जगताचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा उजवा हात असणार्या छोटा शकीलने मुंबईतील व्यापार्यांकडून वसूल केलेली खंडणी पाकिस्तानात पाठवली आहे, अशी माहिती टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अन्वेषणातून समोर आली आहे.
वर्ष २०१७-१८ मध्ये एका व्यापार्याकडून १६ ते १७ कोटी रुपये गोळा करून ते दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवले होते. लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांच्याकडून पैसे गोळा करणे, ते पैसे हवालाच्या माध्यमातून पाकिस्तानात पाठवले जाणे, त्या पैशाचा वापर ‘डी-कंपनी’ चालवण्यासाठी आणि अनधिकृत, असामाजिक तत्त्वांना घेऊन चालणार्या कारवायांसाठी केला जातो.