सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण ! – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

आराबाग (बंगाल) येथे ‘महाभारत संघा’च्‍या वार्षिक समारंभामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

आराबाग (बंगाल) – सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण आहे. अनादी काळापासून सनातन हिंदु धर्माच्‍या सिद्धांतानुसार भारताची राज्‍यव्‍यवस्‍था कार्यरत होती. त्‍या वेळी भारत वैभवाच्‍या शिखरावर होता; परंतु स्‍वातंत्र्यानंतर ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) व्‍यवस्‍थेमुळे बहुसंख्‍य हिंदू असुरक्षित झाले आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्‍या बबिता गांगुली यांनी केले. ‘महाभारत संघा’चा वार्षिक समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. त्‍यात हिंदु जनजागृती समितीला विशेष आमंत्रित करण्‍यात आले होते. या वेळी गांगुली यांनी वरील प्रतिपादन केले. या प्रसंगी गांगुली यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयीही उपस्‍थितांना अवगत केले. या कार्यक्रमात ‘महाभारत संघा’च्‍या स्‍मरणिकेचेही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.