चॅट जीपीटी’ तंत्रज्ञान प्रणालीकडून होत आहे हिंदूंच्या देवता आणि धर्मग्रंथ यांचा अवमान

नवी देहली – ‘चॅट जीपीटी’ (जनरेटिव प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर) या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली ‘आर्टिफीशियल इंटेलिजन्स’चे (कृत्रिम बद्धीमत्ता) कार्य करते. ही एक रोबोटसारखी प्रणाली आहे. आपल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकते. एखाद्याला सुटीचे आवेदन लिहून हवे असेल, तर ते लगेच लिहून दिले जाते. अशा प्रकारचे प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

१. आता याच प्रणालीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, भगवान बुद्ध आदी देवता, तसेच रामायण यांसारख्या धर्मग्रथांविषयी अवामन करणारे विनोद ऐकवले जात आहेत; मात्र दुसरीकडे बायबल, कुराण, येशू आदींविषयी विनोद विचारल्यावर हा आक्षेपार्ह प्रश्‍न असल्याचे उत्तर ही प्रणाली देते. याचा अर्थ हिंदूंच्या धर्मग्रंथांविषयी विनोद या प्रणालीकडे आहेत; मात्र अन्य धर्मांविषयीचे नाहीत. यावरून हिंदूंच्या धर्माचा जाणीवपूर्वक अवमान केला जात आहे.

२. रामायणाविषयी विनोद विचारल्यावर ‘चॅट जीपीटी’ प्रणाली विनोद ऐकवते; मात्र त्या वेळी तो ‘हे लक्षात ठेवले पाहिजे की, रामायण हा हिंदूंचा धार्मिक ग्रंथ असून त्याचा सन्मान राखाला पाहिजे’, असे सांगते. अन्य धर्मियांविषयी विनोद विचारल्यावर विनोद न सांगताच प्रश्‍न अयोग्य असल्याचे सांगतो; म्हणजे या प्रणालीला रामायणाचे महत्त्व ठाऊक असतांनाही ती या संदर्भातील विनोद ऐकवते. ही प्रणाली तिच्या कोडींगप्रमाणे उत्तर देत असते. त्यामुळे तिचे कोडींग करतांना हिंदु धर्माविषयीच्या प्रश्‍नावर आक्षेपार्ह उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने याकडे तात्काळ लक्ष देऊन हा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !