
पुणे – छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणायला कुणाचीच ना नाही, ते ‘स्वराज्यरक्षक’ आहेतच; पण ते ‘धर्मवीर’ नाहीत, असे म्हणणे, हा एक प्रकारे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अन्यायच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते, तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना केले. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी ‘आम्ही शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणणार’, असे वक्तव्य केले. याविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हे एकच ‘जाणता राजा’ आहेत. अन्य कुणाला त्यांच्या नेत्यांना जे कही काय म्हणायचे असेल, ते त्यांनी म्हणावे.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !