हिंगोली – जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे सत्र चालूच आहे. ८ जानेवारी या दिवशी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यांतील अनेक गावांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी भूमी हादरत असल्याने सर्व नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा आर्थिक हानी झाली नसून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.