अमरावती येथे राजमाता जिजाऊंना त्‍यांच्‍या जयंतीनिमित्त अभिवादन !

हिंदु जनजागृती प्रणीत रणरागिणी शाखेचा उपक्रम !

राजमाता जिजाऊंच्‍या स्‍मारकाच्‍या ठिकाणी घोषणा देतांना रणरागिणी

अमरावती, ८ जानेवारी (वार्ता.) – येथे पौष पौर्णिमा या दिवशी म्‍हणजेच ६ जानेवारीला राजमाता जिजाऊंच्‍या तिथीनुसार झालेल्‍या जयंतीनिमित्त स्‍वराज्‍याचा विधाता देणार्‍या वीरमातेला अभिवादन करण्‍यासाठी अमरावती शहर, तसेच गणेशपूर गावात रणरागिणी शाखेकडून स्‍मारक स्‍वच्‍छता आणि पूजन करण्‍यात आले. गणेशपूर गावात हिंदु जनजागृती समितीच्‍या स्‍वरक्षा प्रशिक्षणवर्गात येणार्‍या युवतींनी पुढाकाराने हा उपक्रम केला.

राजमाता जिजाऊंच्‍या छायाचित्राला अभिवादन करतांना रणरागिणी

या वेळी भाजप महिला मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश सचिव सौ. सुरेखा लुंगारे, श्री. दिगंबर लुंगारे, ‘सुश-आसरा फाऊंडेशन’च्‍या अध्‍यक्षा सौ. निशी चौबे, भाजपच्‍या अनुसूचित जाती मोर्चाच्‍या सरचिटणीस सौ. रोशनी वाळके, विश्‍व हिंदु परिषदेच्‍या सौ. गीता बोज्‍जे, हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या सौ. प्राजक्‍ता जामोदे, रणरागिणी शाखेच्‍या सौ. अनुभूती टवलारे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्‍हा समन्‍वयक श्री. नीलेश टवलारे यांसह अन्‍य धर्मप्रेमी महिला आणि पुरुष उपस्‍थित होते. गणेशपूर येथे श्री. संतोष ढोके, श्री. नीलेश कावटकर यांसह स्‍वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्‍या युवती उपस्‍थित होत्‍या.