महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सांगलीत पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  तसेच मान्यवरप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मान्यवर

सांगली, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु युवतींना नियोजनपूर्वक फसवून ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यासाठी ३-३ मास प्रयत्न करून युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात आहे. माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातही हे समोर आले होते आणि आताही पुढे येत आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये कडक कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी मी सरकारला विनंती करणार आहे. आता थांबून चालणार नाही, तर पुढे होऊन कृती केलीच पाहिजे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील धर्तीवर महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’साठी कायदा करणार का ? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, माजी आमदार नितीन शिंदे, प्रसिद्धीप्रमुख केदार खाडिलकर, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.

‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या ‘पोस्टर’चे अनावरण करतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मान्यवर

‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या भित्तीपत्रकाचे अनावरण !

या प्रसंगी ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अभियानाच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘समाजात अनेक लोक असे आहेत, जे थेट राजकीय पक्षाचे काम करत नाहीत; पण त्यांना भाजपच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असते. अशा सर्वांना संपर्क साधून विविध पद्धतीने जोडण्याचे काम ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून होणार आहे. ७०३०७ ७६१६१ या क्रमांकावर नागरिकांनी दूरभाष केल्यावर ते ‘भाजपचे मित्र’ म्हणून जोडले जातील’, असे बावनकुळे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे उघड होत असूनही त्या विरोधात कायदा न होणे संतापजनक !