अफझलखानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा – शासनाने केले ते योग्यच केले. त्यामुळे याविषयी कुणी अपसमज करून घेण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण जगाला आणि भावी पिढीला कळला पाहिजे. यासाठी अफझलखानाची कबर पर्यटकांसाठी खुली करावी, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

अफझलखान कबर परिसरात १ एकर जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या वेळी १९ खोल्या, २ विश्रांतीगृह पाडण्यात आले. यासाठी २८४ कामगार, ४ जेसीबी, २ पोकलेन, २ मोठ्या क्रेन, ९ ट्रॅक्टर आणि ३ ट्रक यांचा वापर करण्यात आला.