मुंबईमध्ये १५ नोव्हेंबर या दिवशी पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा !

मुंबई – हिंदु सभेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी दादर (पश्चिम) येथील पाटील मारुति मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘पंडित नथुराम गोडसे आदरांजली सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर ‘भारताच्या फाळणीचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी पंडित नथुराम गोडसे यांच्या इच्छापत्राचे वाचन करण्यात येणार आहे. समस्त सावरकरप्रेमी आणि समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु सभेच्या वतीने करण्यात आले आहे.