महाराष्ट्र शासनाकडून ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण होते का ?’ याच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना !

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते का ?, याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. येत्या ३ मासांत ही समिती याविषयीचा अहवाल शासनाला सादर करेल.

मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार करू नये यासाठी केदार दिघे यांच्याकडून महिलेला धमकी !

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर ‘बलात्कार करणार्‍या मित्राची तक्रार करू नये, यासाठी एका महिलेला धमकी दिल्याचा’ गुन्हा नोंद करण्यात आला आहे

इतिहासाच्या विकृतीकरणाला शास्त्रशुद्ध मांडणीतून वैचारिक उत्तर देणे आवश्यक ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

गजानन मेहेंदळे म्हणाले की, पाठ्यपुस्तकातील इतिहास हा सरकारी धोरणानुसार शिकवण्यात येतो. खर्‍या इतिहासाचा शोध घेण्यासाठी फारसी भाषेतील मूळ साधनांपर्यंत जाणे आवश्यक आहे.

अकोला येथील सराफावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ६ पोलीस शिपाई बडतर्फ !

सराफ व्यावसायिकावर पोलीस कोठडीत झालेल्या अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणी एकूण ६ पोलीस शिपायांना बडतर्फ केले आहे, तर दोषी साहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावनती (डिमोशन) केली आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण विशेष पोलीस पथकाकडून (‘एस्.आय.टी.’कडून) आतंकवादविरोधी पथकाकडे (‘ए.टी.एस्.’कडे) वर्ग करण्याचा आदेश ३ ऑगस्ट या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आतापर्यंत हे अन्वेषण विशेष पोलीस पथक करत होते.

महाराष्ट्रात रहात असतांना मराठी भाषा शिका ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

कोश्यारी पुढे म्हणाले, ‘‘भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा आणि भाषा इत्यादींविषयी स्वतंत्र ओळख असली, तरीही सर्व भारतियांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे

नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत १० सहस्र बालविवाह !

बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने दायित्व निश्चित केलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांना कठोर शासन केले पाहिजे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

अकोला येथे महिला सरपंचाच्या लाचखोर पतीला अटक !

अकोट तालुक्यातील ग्राम जऊळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी ग्राम जऊळखेड येथील सरपंच महिलेचा पती आशिष निपाणे आणि ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी शासकीय कंत्राटदाराकडे ४६ सहस्र रुपयांची लाच मागितली.

तैवान निमित्तमात्र !

आंतरराष्ट्रीय राजकारणात उक्तीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते, हे अमेरिकेच्या तैवानविषयीच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग परत मिळवण्यासाठी भारतानेही अशीच धडक कृती करणे आवश्यक !