अकोला येथे महिला सरपंचाच्या लाचखोर पतीला अटक !

अकोला – अकोट तालुक्यातील ग्राम जऊळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी ग्राम जऊळखेड येथील सरपंच महिलेचा पती आशिष निपाणे आणि ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी शासकीय कंत्राटदाराकडे ४६ सहस्र रुपयांची लाच मागितली. २ ऑगस्ट या दिवशी ४० सहस्र रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निपाणे यांना रंगेहात पकडले, तर तेलगोटे पसार झाले आहेत.