स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

कोल्हापूर, ३ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन सादर करण्यात आले.

हुपरी येथील पोलीस ठाण्यात निवेदन देतांना धर्मप्रेमी

१. हुपरी येथे नगर परिषदेत प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई आणि नगराध्यक्ष सौ. जयश्री गाट यांना, तसेच हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सौ. अनिता मधाळे, माजी नगरसेवक श्री. प्रकाश बावचे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री महादेव आढावकर, प्रसाद म्हेतर, ऋषिकेश म्हेतर, सचिन माळी, उदय माने, बालाजी शिंदे, धर्मप्रेमी सर्वश्री प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, संदीप निकम, हर्षल पोतदार, ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटन’चे श्री. रवींद्र गायकवाड, ‘लोककल्याण ग्राहक कल्याण संरक्षण संस्थे’चे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

भुयेवाडी येथील कन्या विद्यामंदिर येथील शाळेत मुख्याध्यापक श्री. विजयकुमार केंद्रे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

२. भुयेवाडी आणि निगवे या ग्रामीण भागांत हिंदु जनजागृती समिती अन् श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने कन्या विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक श्री. विजयकुमार केंद्रे, कुमार विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक श्री. पांडुरंग घोरपडे आणि निरीक्षक श्री. पवन इंगळे, तसेच निगवे येथील ज्योतिर्लिंग विद्या मंदिर येथील मुख्याध्यापक श्री. मदन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निगवे येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक श्री. मदन पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

या प्रसंगी भुयेवाडी गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. उमेश जगताप, सर्वश्री समर्थ शिंदे, शिवाजी शिंदे, आदित्य नलावडे, आकाश पाटील, क्षितिज पाटील, प्रदीप शिंदे, पवन कवठे, पारस चौगुले, ओंकार पाटील, कु. संस्कार पाटील आदी सहभागी होते. सर्वच मुख्याध्यापकांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून ‘आम्ही निश्चित राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासंबंधी मुलांचे प्रबोधन करू’, असे मत व्यक्त केले.

कुमार विद्यामंदिर येथे निवेदन देतांना धर्मप्रेमी

विशेष

मलकापूर – वाठार येथील महादेव मंदिर येथे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने (१ ऑगस्ट) सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याचा लाभ १५० ग्रामस्थांनी घेतला. या प्रसंगी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन लावण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री निवास कुंभार, अजय माळी, सागर चौगुले, शुभम माळी, श्रावण पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. गजेंद्र माळी, ‘तंटामुक्त समिती’चे अध्यक्ष श्री. गोरख शिंदे यांनी सहकार्य केले.